📢 परिपत्रक

मुख्याध्यापक यांची शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्य व जबाबदाऱ्या


📋 परिपत्रक

जिल्हा परिषद, पुणे

मुख्याध्यापक यांची शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या

📌 जा.क्र.: प्राथ-२, ९९९३/२०२१  |  दिनांक: ०९/०९/२०२१  |  विषय: मुख्याध्यापक यांची शैक्षणिक व प्रशासकीय कर्तव्ये
प्रस्तावना: प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. अध्यापक, प्रशासक, व्यवस्थापक अशा विविध भूमिकेतून मुख्याध्यापकांना कार्य करावे लागते. सदर परिपत्रक जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लागू राहील.
🏫 शाळाप्रमुख — मुख्य कर्तव्ये
  1. शाळेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून कर्तव्ये व जबाबदारी स्वीकारून पार पाडणे.
  2. मुख्याध्यापक म्हणून शाळेचे सर्वच क्षेत्रात नेतृत्व करणे — भौतिक सुविधा विकसित करण्यामध्ये पुढाकार घेणे.
  3. शाळेतील शिक्षकांचे शैक्षणिक नेतृत्व करणे — विविध क्षमता विकासाकरिता पाठिंबा, मार्गदर्शन व सहाय्य करणे.
  4. शाळेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारून कार्यरत राहणे.
📚 शाळा प्रवेश — शैक्षणिक कर्तव्ये
  1. प्रवेश पात्र विद्यार्थी शोध सूची तयार करणे — पात्र विद्यार्थ्यांचे १००% प्रवेश पूर्ण करणे.
  2. शाळेमध्ये प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे — SMC ची मदत घेणे.
  3. परिसरातील शालाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशित करणे.
  4. स्थलांतरित मुलांसाठी संचयी नोंदपत्रक देणे.
  5. दिव्यांग विद्यार्थी शाळेत दाखल करणे — विशेष शिक्षकांची मदत घेणे.
  6. वयानुरूप बालकांना वयानुरूप इयत्तेमध्ये प्रवेश देणे.
📋 शैक्षणिक कार्याचे नियोजन
  1. शाळेतील शिक्षकांना इयत्ता, विषय यांचे वितरण करणे.
  2. शाळेचे वेळापत्रक तयार करणे व अंमलबजावणी करणे.
  3. वार्षिक नियोजन / साप्ताहिक / दैनिक पाठ नियोजन करून घेणे.
  4. सहशालेय उपक्रमांसाठी शिक्षकांना जबाबदारी वाटप करणे.
  5. दीर्घ सुट्टीनंतर शाळापूर्व तयारी करणे — SMC बैठक आयोजित करणे.
  6. विद्यार्थी हजेरी, शिक्षक हजेरी, प्रवेश फॉर्म व आवश्यक रजिस्टर उपलब्ध करणे.
🧹 स्वच्छता
  1. शालेय परिसर, वर्गखोल्या, ग्रंथालय, स्वच्छतागृहे शाळा सुरु होण्यापूर्वी स्वच्छ करून घ्याव्यात.
  2. विद्यार्थ्यांना संभाव्य धोक्याचे साहित्य योग्य प्रकारे ठेवण्यात यावे.
  3. साथ रोगांबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी — मास्क, सॅनिटायझर वापरणे.
⚠️ आपत्ती व्यवस्थापन
  1. शाळेमध्ये आपत्ती निर्माण होणार नाही यासाठी पूर्व काळजी घेणे — वीज स्पार्किंग वेळीच दुरुस्त करणे.
  2. आपत्ती व्यवस्थापन बाबत विद्यार्थी व शिक्षकांना सूचना देणे.
  3. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे संपर्क क्रमांक शाळेत ठेवणे.
  4. शाळेत चालू स्थितीतील अग्निशमन यंत्र सातत्याने उपलब्ध ठेवणे.
📖 अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन
  1. शाळा सुरू होताच मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करणे.
  2. प्रत्येक विद्यार्थ्यांचा अध्ययनातील सहभाग आनंददायी व बालस्नेही वातावरणातून घेणे — RTE कलम १७.
  3. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मूलनिहाय कृती आराखडा तयार करणे.
  4. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रक्रियेची अंमलबजावणी — RTE कलम २९.
  5. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या फक्त सकारात्मक नोंदी घ्याव्यात.
  6. नैदानिक चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणींचा शोध घेऊन उपाय करणे.
  7. इयत्ता आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण पूर्तता प्रमाणपत्र देणे.
🏆 स्पर्धा परीक्षा
  1. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांबाबत माहिती देणे व प्रोत्साहन देणे.
  2. आवेदनपत्र भरणे, आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन करणे.
  3. NVS, विद्या निकेतन, सैनिकी विद्यालय, क्रीडा प्रबोधिनी, शिष्यवृत्ती परीक्षा — नियोजन करणे.
📦 शैक्षणिक साहित्य व ग्रंथालय
  1. मूलनिहाय व स्तरनिहाय शैक्षणिक साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करून देणे.
  2. शिक्षकांनी स्वतः जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्य तयार करावे.
  3. शाळेतील ग्रंथालय सतत वापरात ठेवावे — पुस्तके वाटप, जमा नोंद वेळच्या वेळी ठेवणे.
  4. CSR मधून ग्रंथ संपदा वाढवणे.
💻 तंत्रज्ञान, सुरक्षा व आरोग्य
  1. अध्ययन, अध्यापनासाठी तंत्रज्ञान व साधनांचा वापर करावा.
  2. सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन करणे — आक्षेपार्ह दृश्य विद्यार्थ्यांना दाखवू नये.
  3. सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे.
  4. दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकामार्फत पुढील कार्यवाहीसाठी नोंदवणे.

← सर्व posts बघा